Breaking News

कोरोना बाधितांचे प्रमाण 10 टक्याच्या आता आल्यामुळे निर्बंध शिथिल ; नागरिकांनी गाफिल राहून गर्दी करु नये

Restrictions are relaxed now that the corona infestation rate is 10 percent ; Citizens should not be ignorant and crowd

    सातारा  (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण 10 टक्क्याच्या आत आल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनला शिथीलता दिली आहे.   नागरिकांनी गाफील न राहता बाजारपेठेमध्ये गर्दी करु नये,   प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन स्वत:ला व दुसऱ्यांना कोरोनाचा प्रादुभार्व होणार नाही याची खरबदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

    जिल्ह्यातील कोरोना संदर्भातला आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केले. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अयजकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर, सुरक्षित अंतर पाळले पाहिजे व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे , असे आवाहन करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या कमी झाली आहे. कुणीही कोरोना गेला, असे समजू नये प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. लग्न समारंभामध्ये मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच लग्न समारंभात फोटो काढताना मास्क घालत नाहीत यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. लग्न समारंभातील उपस्थितांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहनही पालकमंत्री    श्री. पाटील यांनी केले आहे.

No comments