Breaking News

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज - श्रीमंत सत्यजितराजे

वृक्षारोपण करताना श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर

The need of the hour is to plant trees and cultivate trees to maintain the balance of nature - Shrimant Satyajitraje Naik Nimbalkar

    फलटण (प्रतिनिधी) - वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन, जंगलांचा ऱ्हास, जंगलातील वणवे, वाढते तापमान, कचरा, ई-कचरा, प्लास्टिकचा अतोनात वापर आदीमुळे पर्यावरणास हानी पोहोचत आहे. निसर्गाचा समतोल ढासळला आहे, त्यामुळे  अवेळी पाऊस, भूकंप, त्सुनामी विविध प्रकारची वादळे अशी अनेक संकटे येत आहेत. या संकटांना रोखण्यासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे संचालक युवा नेते श्रीमंत सत्त्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस, फलटणच्या परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपणानंतर श्रीमंत सत्यजितराजे बोलत होते. यावेळी गोविंदचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

    मानवाने प्रगतीच्या आणि सर्वांगीण विकासाच्या नावाखाली निसर्गाची लयलूट केली असून ती करताना निसर्गाचा समतोल राखला गेला नसल्याने अवेळी पाऊस, त्सुनामी, भूकंप, ज्वालाग्रहीचा उद्रेक व विविध प्रकारची वादळे अशी एक ना अनेक संकटे येत आहेत. भविष्यात या संकटापासून दूर रहावयाचे असेल तर "झाडे लावा, झाडे जगवा" हा मंत्र सर्वांनाच जपावा लागेल तरच निसर्गसृष्टी अबाधीत राहील असे मतही श्रीमंत सत्त्यजितराजे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

No comments