Breaking News

फलटण तालुक्यात 106 तर सातारा जिल्ह्यात 1196 कोरोना बाधित ; 23 बाधितांचा मृत्यू

Corona virus Phaltan updates :  1 died and 106 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 7 जून 2021 - फलटण तालुक्याची  कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 106 आली आहे.  यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 62 व आर.ए.टी. 44 चाचण्यांचा समावेश आहे.  मात्र  जिल्हा प्रशासनाकडून आज  जाहीर करण्यात आलेली फलटण तालुक्यातील  कोरोना बधितांची संख्या 66 आहे.   

    आज  मिळालेल्या  आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 106 बाधित आहेत.  यामध्ये फलटण शहर 14 तर ग्रामीण भागात घाडगेवाडी 2, खामगाव 2, खराडेवाडी 17, खटकेवस्ती 2, बरड 2,  कोळकी 3, मुंजवडी 1,  झिरपवाडी 1, तिरकवाडी 4, होळ 1, राजाळे 3, साखरवाडी 9, सालपे 1, चव्हाणवाडी 1, जाधववाडी 2, रायगड 3, कोपर्डे ता खंडाळा 1,  घाडगेमळा 2, ढवळ 1, कापशी 2, हिंगणगाव 1,  विडणी 2, निरगुडी 5, गिरवी 2, रावडी बु 4,  साठे 1, दुधेबावी 2,  वाटर निंबाळकर 3, चौधरवाडी 3, तामखडा 1,  खुंटे 1, राजुरी 2,  पवारवाडी 1, कुरवली बु 1,  पळशी सातारा 1, दहिवडी ता माण 1, लोणंद ता खंडाळा 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

सातारा  जिल्ह्यात 1196 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू

    सातारा  जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1193 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 23 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

      तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 31 (7906), कराड 133 (23627), खंडाळा 73 (10997), खटाव 398 (17284), कोरेगांव 163 (15271), माण 54 (11988), महाबळेश्वर 11 (4133), पाटण 51(7400), फलटण 66 (27173), सातारा 185 (36943), वाई 25 (11947) व इतर 6 (1119) असे आज अखेर  एकूण 175788 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

      तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (179), कराड 3 (681), खंडाळा 1 (140), खटाव 0 (430), कोरेगांव 2 (335), माण 2 (232), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (161), फलटण 1 (264), सातारा 12 (1108), वाई 0 (313) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3887 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments