Breaking News

अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिग्रेटेड रोड ऑक्सिडेंट डेटाबेस अँड्रॉईड ॲप

Integrated Road Accident Database Android App to Reduce Accident Numbers

    सातारा   (जि.मा.का):    गर्व्हमेंट ऑफ इंडिया आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचा इंटिग्रेटेड रोड ऑक्सिडेंट डेटाबेस (आयआर एडी ) हे अँड्रॉईड ॲप राबविण्यात येणार आहे. या ॲपचे मुख्य उद्दिष्ट देशाची रस्ते सुरक्षा वाढवणे हे असून  एन.आय.सी आणि आय.आय.टी. मद्रास  यांनी संयुक्तपणे यावर काम केले आहे .

    आयआरएडी अॅप्लिकेशन अँड्राइड असून, प्रत्येक अपघातानंतर घटनास्थळी भेट देणारे पोलिस अधिकारी, अंमलदार यांना अपघाताचे छायाचित्र, व्हिडिओ शूटिंग अपलोड करण्याची सोय त्यामध्ये केली आहे. त्यामुळे गुगल लोकेशन क्लिक केल्यामुळे अपघाताचे घटनास्थळ योग्य प्रकारे निश्चित करण्यास मदत होणार आहे.

       जिल्ह्यातील 29 पोलिस ठाण्यातील  108  अपघाताची नोंद झाली आहे. यासाठी पोलिसांना एन.आय.सी. तर्फे प्रशिक्षण दिले गेले आहे. या ॲपसाठी  नोडल अधिकारी म्हणून पोलिस उपनिरिक्षक अंतम खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  एन.आय.सी. चे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संजय गुमास्ते यांनी या विषयी माहिती दिली.

No comments