पेट्रोल दरवाढीच्या विरोधात फलटण येथे काँग्रेसचे आंदोलन
Congress agitation at Phaltan against petrol price hike
फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटी तसेच युवक काँग्रेस तर्फे पेट्रोल दरवाढीच्या विरोधात फलटण येथे पेट्रोलपंप वर केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन करण्यात आले.
फलटण काँग्रेस कमिटी भाजप प्रणित केंद्र सरकार हटाव व नरेंद्र मोदी हटाव अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके व फलटण तालुका कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, फलटण तालुका उपाध्यक्ष अशोक शिंदे व फलटण तालुका ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, सातारा जिल्हा सरचिटणीस शंकर लोखंडे, सातारा जिल्हा अनुसूचित जाती जमातीच्या सेलचे जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ देठणकर, शहर अध्यक्ष मोहीत बारशीकर, अल्प संख्या सेलचे फलटण तालुकाध्यक्ष ताजुभाई बागवान व शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, फलटण शहर अध्यक्ष पंकज पवार, फलटण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अजिंक्य कदम, फलटण शहर युवक अध्यक्ष प्रितम जगदाळे तसेच कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments