Breaking News

प्रत्येक गावाने कोरोनामुक्त गाव योजनेत सहभागी व्हावे, आपले गाव कोरोनामुक्त करावे - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Every village should participate in the coronamukta village scheme, make your village coronamukta - Guardian Minister Balasaheb Patil

    सातारा (जिमाका) :- राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने "कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना"  सुरू केली आहे. या योजनेत ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून आपले गाव कारोनामुक्त करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

    जिल्हाधिकारी कार्यातयातील परिषद सभागृहात आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेतला.  यावेळी त्यांनी आवाहन केले.  या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते

    या योजनेंतर्गत प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय त्यांना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभाग नोंदवावा.

    विविध गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहेत .  या कक्षांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी भेटी द्याव्यात, यासाठी एक वेळापत्रक तयार करावे. गृह विलगीकरण बंद करण्यात आले असून जास्तीत जास्त रुग्णांना संस्थात्म्क विलगीकरण कक्षात दाखल करावे.

    या बैठकीमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व रिलायन्स फाऊंडेशन्सच्यावतीने 25 ऑक्सिजन काँन्सट्रेशन मशिन्स देण्यात आल्या आहेत.  या मशीन्स पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आरोग्य विभागाला सुपूर्त करण्यात आल्या.

No comments