Breaking News

फलटणच्या राजु बोके व इतर चौघांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Action under Mocca against Raju Boke and four others

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण :-  विनापरवाना पिस्टल व  हनी ट्रॅप प्रकरणी सध्या अटकेत असणाऱ्या फलटण येथील राजू बोके यांच्यासह  इतर चार जणांच्या विरोधात मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे फलटण व बारामती तालुक्यातील अनेक जणांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्ह्यात कार्यभार स्विकारल्यापासून 10  टोळ्यातील 58 गुन्हेगारांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून 41जणांना हद्दपार करण्यात आले आहे. यापुढेही गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्का व हद्दपारी अन्वये अशीच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले आहे.

    फलटण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ मे २०२१ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे दोन मित्र भडकमकरनगरच्या पश्चिम बाजुस असणारे बाणगंगा नदीचे पात्रानजिक असणाऱ्या चिंचेच्या झाडाखाली बोलत असताना, तेथे तीन अनोळखी इसम येवुन त्यांनी फिर्यादी व त्यांचे मित्र यांना मारहाण शिवीगाळ करुन यांचेकडील सोन्याचे वागीने , रोख रक्कम , मोबाईल , गाडी , ए.टी.एम. पॅनकार्ड , ब्लुटूथ, आधारकार्ड असा एकुण ५ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करुन नेला म्हणुन वगैरे मजकुरची फिर्याद यांनी दिली होती त्यानुसार याबाबत गुन्हा दाखल झाला होता.

    सदर गुन्हाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ए.ए.कदम हे करीत होते . दरम्यान तपासामध्ये आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले. या टोळीतील टोळी प्रमुख महेश जयराम जगदाळे (वय २७ वर्षे रा . कांबळेश्वर ता . बारामती जि पुणे) याचे वर एकुण ७ गुन्हे दाखल आहेत  तर टोळीतील सदस्य ऋतिक ऊर्फ बंटी देवानंद लोंडे (वय १ ९ वर्षे रा . कांबळेश्वर ता . बारामती जि.पुणे) याचे वर एकुण १ गुन्हे दाखल आहेत, संकेत सुनिल जाधव (वय २४ वर्षे रा . कल्पनानगर तांदुळवाडी रोड बारामती ता . बारामती जि.पुणे) याचे वर एकुण ४ गुन्हे दाखल आहेत, राजु ऊर्फ राज राम बोके (वय .३४ वर्षे रा मंगळवार पेठ , फलटण ता.फलटण जि.सातारा)  याचे वर एकुण १३ गुन्हे दाखल आहेत, दिलीप राजाराम खुडे (वय .३२ वर्षे रा लक्ष्मीनगर , फलटण जि.सातारा)  याचे वर एकुण २ गुन्हे दाखल आहेत.

     या टोळीतील आरोपींनी संघटितपणे , आर्थिक फायद्याकरीता सातारा , सोलापूर व पुणे जिल्हयातील महामार्ग व इतर जोडरस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवाशी , दुचाकी स्वार व महिला प्रवाशी , जोडपे व्यापारी यांच्यावर लक्ष ठेवुन वाहनाचा पाठलाग करुन त्यांच्या जवळील सोन्याचांदीचे दागिने , मोबाईल हॅण्डसेट , रोख रक्कम असा ऐवज वेगवेगळया घातक हत्याराचा धाक दाखवुन , त्यांना मारहाण करुन दरोडे , गंभीर दुखापतीसह जबरी चोरी , चोरी दुखापत अशा प्रकारचे गुन्हे असे करीत असल्याचे निष्पन्न झाले होते.

    फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण १९९९ अन्वये या टोळीवर कारवाई करीता पोलिस अधीक्षक , सातारा यांच्या मार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक , कोल्हापूर परिक्षेत्र , कोल्हापूर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता .या प्रस्तावास कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक , मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. या गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे हे करीत आहेत . 

    पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्ह्यात कार्यभार स्विकारल्यापासून सन २०२० मध्ये २ व सन २०२१ मध्ये आजपर्यंत ८ असे एकुण १० संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधिल ५८ इसमांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे . तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये ४१ इसमांना हद्दपार केले आहे. यापुढेही गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्का व हडपारी अन्वये अशीच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले आहे.

    मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल ,अपर पोलिस अधीक्षक धीरज पाटील , उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे,  पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक ए.ए.कदम, पो.हवा.प्रविण शिंदे , पो.ना. अमित सपकाळ , पो.ना. शरद तांबे यांनी मोक्का कारवाई करीता सहभाग घेतला होता.

No comments