फलटण शहर लसीकरण आजची स्थिती
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. १६ मे २०२१ -
उपजिल्हा रुग्णालयामार्फत वरील ठिकाणी फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे लसीकरण करण्यात येत आहे.
दिनांक :- १६/०५/२०२१
वेळ. :- सकाळी १० वा सुरु
*अ) १८ ते ४४ वर्षे वयोगट या वयोगटासाठी कोणतेही लसीकरण केले जाणार नाही.
*ब) कोविशिल्ड लस
मुधोजी हायस्कूल, व्यंकटराव विभाग
१) हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स व ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या ७० व्यक्तीं ना दि १६/०५/२०२१ रोजी दुसऱ्या डोसची लस दिली जाईल.
२) हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स व ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या ३० व्यक्तींना दि १६/०५/२०२१ रोजी पहिला डोस दिला जाईल
क) कोवॅक्सीन चा दुसरा डोस
मुधोजी हायस्कूल, मालोजीराजे विभाग
१) हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स व ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या १०० व्यक्तीं ना दि १६/०५/२०२१ रोजी दुसऱ्या डोसची लस दिली जाईल.
२) पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही
कोविशिल्ड चा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. (दि १९ फेब्रुवारी पूर्वी पहिला डोस झालेला असणे आवश्यक )
कोवॅक्सीन चा पहिला डोस घेऊन २८ ते ३० दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे
(दि १६ एप्रिलपूर्वी पहिला डोस पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे)

No comments