संभाजी ब्रिगेड फलटण च्या वतीने लोकसहभागातून कोरोना रुग्णांना अंडी वाटप
![]() |
| कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर कोरोना केअर सेन्टर येथे अंडी देताना संभाजी ब्रिगेड फलटणचे पदाधिकारी |
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - संभाजी ब्रिगेड फलटणच्या वतीने लोकसहभागातून चला देऊ या मदतीचा हात, या उपक्रमा अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, फलटण मधील लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर कोरोना केअर सेन्टर, सजाई गार्डन कोविड केअर सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शासकीय वसतिगृह कोविड सेंटर जाधववाडी, आयुर केअर सेंटर तसेच विडणी येथील ग्रामपंचायत विलगिकरण कक्ष येथे कोरोना वर उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना पहिल्या टप्प्या अंतर्गत 2200 अंडी वाटप करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड चे सातारा जिल्हा अध्यक्ष विशाल शिंदे, प्रदीप घाडगे, विनीत शिंदे, संग्राम साळुंखे, सचिन अभंग, राहुल शिर्के, सुबोध शिर्के, पंकज शिंदे, वैभव अभंग, बजरंग भगत, अभिजित भोसले , तेजस लोणकर, विशाल भोसले इत्यादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments