Breaking News

दक्षता घ्यावी लागणार ; जिल्ह्यात 1310 तर तर फलटण तालुक्यात 395 कोरोना बाधीत

Corona virus Satara District updates :  30 died and 1310 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 18 - जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1310 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 30 बाधितांचा मृत्यु झाला तर फलटण तालुक्यात 395 रुग्ण कोरोना बाधित सापडले असून, आज फलटण तालुक्यात 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

    फलटण तालुक्यात कोरोना बाधितांची  संख्या कमी होताना दिसत नाहीये. दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यातील कोरोना संख्या वाढत असताना दररोजचा आकडा 2600 पर्यंत गेला होता आणि फलटण तालुक्याचा 400 पर्यंत गेला होता.  जिल्ह्यात कडक निर्बंध लागल्यानंतर जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली परंतु फलटण तालुक्याची कोरोना बधितांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. अद्यापही कोरोना बधितांची संख्या दररोज 200 ते 400 दरम्यान येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असून, ही बाब चिंताजनक आहे.  नागरिकांना अजूनही दक्षता घ्यावी लागणार आहे. नागरीकांनी  कंपल्सरी मास्कचा वापर  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. 

      तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 67 (6581), कराड 156 (19701), खंडाळा 38 (8542), खटाव 90 (12308), कोरेगांव 83 (11827),माण 80  (9335), महाबळेश्वर 25 (3764), पाटण 51 (5727), फलटण 395 (18783), सातारा 206 (30979), वाई 102 (10232 ) व इतर 17 (841) असे आज अखेर  एकूण   138620 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

        तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (144), कराड 8 (573), खंडाळा 4 (113), खटाव 2 (343), कोरेगांव 2 (282), माण 1 (183), महाबळेश्वर 0 (41), पाटण 1 (142), फलटण 1 (233), सातारा 8 (926), वाई 2 (273) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3253  कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments