Breaking News

‘ईद-उल-फित्र’ तथा ‘रमजान ईद’ निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

Congratulations from Deputy Chief Minister Ajit Pawar on the occasion of Ramadan Eid

    मुंबई  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘ईद-उल-फित्र’ तथा ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून यंदाची ‘ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना केली आहे. रमजान ईद आपल्याला त्याग, संयम, परोपकार, विश्वबंधूत्वाची, सर्वांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. कुटुंबासोबत ईद साजरी करताना समाजातील गरीब, दुर्बल, वंचित बांधवांनाही आनंदात सहभागी करुन घ्यावे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.

No comments