कोरोना नियमाचे पालन करुन तरडगाव ग्रामदैवत भैरवनाथ-जोगेश्वरीची औपचारिकरीत्या यात्रा संपन्न
Bhairavnath-Jogeshwari Yatra formally held at Tardgaon
तरडगाव (संजय किकले): तरडगाव ग्रामदैवताची यात्रा पाच पंच व पुजारी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंग चे नियमांचे पालन करून देवाचा छबीना (वरात) महाआरती होउन संपन्न झाली असल्याची माहीती ग्रामदैवताचे पुजारी श्री. सुनील क्षिरसागर यांनी दिली.
सालाबाद प्रमाणे मोठ्या जल्लोषात होणारी तरडगाव ग्रामदेवता भैरवनाथ-जोगेश्वरी देवाची यात्रा यावर्षी साध्यापध्दतीने संपन्न झाली. कोरोना महामारी संकटामुळे जिल्हाधीकारी यांनी घालुन दिलेल्या नियमांचे पालन करुन औपचारिकरित्या विवाह सोहळा संपन्न झाला. त्या दिवसापासुन यात्रेस प्रारंभ होतो. या ८ दिवसात दैवतास विधीवत अभीषेक नेवैद्य जागर करत प्रतीपदेस दि.१२/५/२१ रोजी महा अभिषेक करुन दैवतास अलंकार,संपुर्ण नववस्त्र परीधान करुण मंदीरात पाच पाऊलं करुण देवाचा छबीना (वरात) काढण्यात आला. शिरवळहुन अंबीकादेवीची साहन काठी तुळजापूराहुन परत येताना तरडगावची यात्रा भरते परंतु कोरोना महामारी मुळे सासनकाठी वीना गेली दोन वर्षे यात्रा जुन्या अठवनीना ऊजाळादेत संपन्न होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यात नाराजीचे वातावरण पहावयास मिळाले.
No comments