Breaking News

कोविड लस का घ्यावी ? आणि कुठली घ्यावी ?

डॉ. प्रसाद जोशी, अस्थीरोग शल्यचिकित्सक, फलटण

Why take covid vaccine?  And which one to take?

    सध्या आपण कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये अडकलो आहोत . रुग्ण  Patients  झपाट्याने वाढत आहेत आणि त्याबरोबर मृत्यू दर पण वाढतो आहे . 

कोरोना पासून बचाव करायचा असेल तर त्रिसूत्री म्हणजेच - १.मास्क २. सॅनिटायझेशन sanitisation आणि ३. सोशल डिस्टनसिंग Social Distancing ही पाळलीच पाहिजे . पण त्याहीपेक्षा जे आपल्याला सुरक्षा देणार आहे ते म्हणजे त्यावरील लस.

लस का घ्यावी ? Why take covid vaccine? 

हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे की लस घ्यावी की नाही , त्यामुळे मला कोरोना तर होणार नाही ना? मला काही  साईड इफेक्टस (side effects) तर होणार नाहीत ना?

पण प्रियजनहो लस घेणे हा सध्या एकमेव उपाय आपल्या हातात उरलेला आहे . 

ती का घ्यावी याचे विश्लेषण करण्याआधी किती प्रकारच्या लसी आहेत त्याकडे एक नजर टाकूयात 

 लस कोणती घ्यावी?  Which vaccine to take

सध्या भारतात दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत .

कोव्हीशिल्ड Covieshield जी की सिरम इन्स्टिट्यूट serum institute नी बनवली आहे व  कोवॅक्सिन Covaxine जी की भारत बायोटेक Bharat biotech नी बनवली आहे . 

कोव्हीशिल्ड Covieshield ही लस chimpanjee adeno virus पासून बनवली आहे की जिचे स्पाईक प्रोटीन हे कोरोना virus शी संलघ्न आहे आणि त्यामुळे येणारी immunity ही कोरोना विरुद्ध उपयोगी ठरते आहे.

कोवॅक्सिन Covaxine ही लस attenuated डेड कोरोना जंतूं पासून बनवलेली आहे की जिच्या मुळे तुम्हाला कोरोनाच्या या  अँटीबॉडीज antibodies डायरेक्ट तयार होणार आहेत. 

सर्वात महत्वाचे दोन्ही लसी उत्तम आहेत आणि  कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

जेव्हा आपण एखादी लस घेतो तेव्हा आपलेच शरीर त्या जंतूं विरुद्ध अँटीबॉडीज antibodies तयार करते आणि मग जरी आपल्याला इन्फेक्शन infection झाले तरी त्या आजारापासून आपल्याला त्रास होत नाही . 

 किती डोस घेणे आवश्यक?  How much dose to take

    दोन्ही पैकी कोठलीही लस घेतली तरी एकूण दोन डोस घेणे आवश्यक आहे . पहिल्या डोस नंतर दुसरा साधारण 1 महिना ते दीड महिन्याच्या कालावधी मध्ये घ्यावा आणि मग त्यानंतर १ महिन्यानी आपली immunity चेक करावी . त्यासाठी Serosurveillance for covid IgG antibodies हे करून घ्यावे आणि त्याचा score हा २० किंवा २०च्या वर यावा ही अपेक्षा .ही immunity किती दिवस टिकेल , तिसरा डोस घ्यावा लागेल की नाही अजून काही चित्र स्पष्ट नाही. 

लस कोणाला आणि कुठे उपलब्ध आहे ? Who and where is the vaccine available?

पहिल्या फेरीमध्ये अग्रभागी आरोग्य सेवा कर्मचारी frontline health care workers की ज्या मध्ये सर्व डॉक्टर्स , आरोग्य कर्मचारी, paramedical स्टाफ  आणि सर्व पोलीस फोर्स यांना देण्यात आली.

दुसऱ्या फेरी मध्ये ६० वया वरील सर्व जेष्ठ मंडळी व ४५ वया वरील सर्व लोक ज्यांना काही Co-morbidities आहेत जसे की High BP, Diabetes , Asthama, Cancer आणि काही आजून आजार.

तिसऱ्या टप्प्यात आता ४५ वयोगटावरील सर्व लोकांना आता लस उपलब्ध आहे .

लस ही सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे आणि private हॉस्पिटल्स की जी गव्हर्नमेंट नी ठरवून दिलेली आहेत किंवा जिथे महात्मा फुले योजना कार्यरत आहे अशा ठिकाणी २५० रुपये भरून लस मिळत आहे.

पुढच्या टप्प्यात १६ वर्षा वरील सर्व लोकांना बहुतेक लस उपलब्ध होईल

तर प्रियजनहो ,

दोन्ही पैकी कोणतीही लस घ्या पण दोन्ही डोस एकाच प्रकारच्या लसीचे घ्या. म्हणजेच कोव्हीशिल्ड Covieshield चा पहिला डोस तर दुसरा डोस हा कोव्हीशिल्ड Covieshield चाच घ्यावा, कोवॅक्सिन Covaxine चा घेऊ नये,  किंवा कोवॅक्सिन Covaxine चा पहिला डोस तर दुसरा डोस हा कोवॅक्सिन Covaxine  चाच घ्यावा, कोव्हीशिल्ड Covieshield चा घेऊ नये,  असे करणे घातक आहे किंबहुना त्याचा काही फायदा होणार नाही.

लस घेतल्यापासून ३ महिने सर्वांनी सर्व प्रकारची काळजी घेणे अगदी जरुरीचे आहे.
पहिला डोस झाल्या नंतर आपण पूर्णपणे सुरक्षित आहे हा भ्रम आणि अति आत्मविश्वास overconfidence नसावा!
तसेच रोजचा व्यायाम , सकस आणि मोजकाच आहार , भरपूर पाणी पिणे हे इष्टच!
जशी माझे कुटुंब माझी जाबबदारी तसेच कोरोना लस घेणे ही माझीच जबाबदारी आहे हे प्रत्येकांनी ओळखले पाहिजे.

लस घेतल्यानंतर अंग दुखणे, कणकण येणे, गळाठा होणे , थंडी वाजून येणे अशी लक्षणे १ते २ दिवस दिसत आहेत की जी कोरोना झाल्यानंतर होणाऱ्या लक्षणांची सौम्य झलक आहे पण त्यापासून हानी काही नाही .

कोरोना हा आपल्याबरोबर राहणारच आहे. आता आपल्याला त्याच्या बरोबर जगायला शिकले पाहिजे,

जाता जाता ...

कोरोना पासून वाचायचे असेल ,
तर लसीकरण करावे हे महत्वाचे,
कुठलीही शंका आणू नका मनात,
घ्या लस पण वागू नका बिनधास्त.
-  डॉ. प्रसाद जोशी
जोशी हॉस्पिटल प्रा. ली.
अस्थीरोग शल्यचिकित्सक, फलटण

No comments