Breaking News

निंभोरे येथे मॅग पेट्रोल पंपावर चोरी

Theft at Mag petrol pump at Nimbhore

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - निंभोरे तालुका फलटण येथील मॅग पेट्रोलियम पंपाच्या केबिनचे दार तोडून, आत प्रवेश करून आत मधील कौंटरच्या ड्रॉव्हर मधील  रोख रक्कम व दोन मोबाईल असे एकूण 32 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी रात्री 1:45 वाजण्याच्या सुमारास निंभोरे तालुका फलटण येथील मॅग पेट्रोलियम पंपावर अज्ञात आरोपी यांनी पेट्रोल पंपाचे केबिनचा दरवाजा तोडुन, आत प्रवेश करुन केबिनमधील काऊन्टरच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेली रक्कम व सॅमसंग व जिओ कंपनीचा मोबाईल असा एकुण ३२२३५ रुपये किमतीचा मुद्देमाल मुददाम लबाडीने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरुन नेला असल्याची फिर्याद विशाल प्रकाश यादव यांनी दिली आहे.

अधिक तपास सहाय्यक फौजदार यादव करीत आहेत.

No comments