Breaking News

त्रेमासिक विवरणपत्र ईआर-1 ; 30 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आवाहन

Quarterly statement ER-1; Appeal to submit by April 30

      सातारा  (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व  खाजगी आस्थापनांनी  तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक  व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष, स्त्री, एकूण ( त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1) सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारकर आहे.

     त्रेमासिक विवरण पत्र (ईआर-1) दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswyam.gov.in या बेबपोर्टलवर सादर करावे. प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनेस युजर आयडी, रजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड यापूर्वीच दिलेला आहे.  या संदर्भात काही समस्या असल्यास, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय भवन सातारायेथे अथवा कार्यालयाच्या 02162-239938 येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, राजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी कळविले आहे.

No comments