Breaking News

कुरेशीनगर येथे पोलिसांची रेड : 40 जनावरांसह 550 किलो मांस सापडले ; 32 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Police raid at Qureshinagar: 550 kg of meat found with 40 animals

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण :-  शहरातील कुरेशी नगर येथे शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 550 किलो गायीचे मांस व कत्तलीसाठी डांबून ठेवलेली 40 वासरांसह घटनास्थळावरुन 32 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 5 जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,   मध्यरात्री नंतर सोमवार दि. 11 एप्रिल रोजी 1:30 AM वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील कुरेशी नगर येथे  फलटण शहर पोलिसांनी छापा टाकला. कुरेशीनगर येथे जाकीर कुरेशी यांच्या घराचे पाठीमागे असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये इसम नामे वाजिद जाकीर कुरेशी, इलाही हुसेन कुरेशी, गौस रहीम कुरेशी, तोसीब अनिस कुरेशी, अरबाज नियाज कुरेशी सर्व राहणार कुरेशीनगर, मंगळवार पेठ फलटण हे अवैधरित्या कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना जनावरांची कत्तल करीत असताना मिळून आले.  तसेच कत्तलीसाठी आणलेली एकूण 40 वासरे दाटीवाटीने टेम्पो गाडीत भरलेल्या स्थितीत मिळून आली.  पोलीस व पंच येण्याची चाहूल लागताच तोसिब कुरेशी व अरबाज कुरेशी हे पळून गेले.  उर्वरित तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी 5 जणांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. 

    पोलिसांनी घटनास्थळावरुन 550 किलो जनावरांचे मास, 40 लहान जर्शी गाईची वासरे एक वर्षातील, टाटा कंपनीचा 407 टेम्पो क्रमांक एम एच 20 एफ 6768, पांढरी रंगाची इनोवा कार क्रमांक एम एच 01 व्ही 9860, इनोवा कार ची चावी, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, दोन मोबाईल हँडसेट असा एकूण 32 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुध्द महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व प्राणी छळ अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल दिग्विजय सांडगे यांनी दिली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन रावळ करीत आहेत.

    सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि नवनाथ गायकवाड, सपोनि सचिन रावळ, सपोफौ शिंदे, पो हवा शिंदे, चालक पो हवा घाटगे, चालक पो हवा खाडे, पो हवा येळे, चालक पोना करपे, होमगार्ड हिवरकर, गोसावी, जाधव , भिसे यांनी केली आहे. 

No comments