Breaking News

धोका वाढला! फलटण तालुक्यात 153 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 72, ग्रामीण 81 तर 1 मृत्यू

Corona virus Phaltan updates :  1 died and 153 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 11 एप्रिल 2021  - जिल्हा प्रशासनाकडून आज 11 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 153 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 72 व्यक्ती तर ग्रामीण भागात 81 रुग्ण सापडले आहेत.  दुसऱ्या लाटेत आज प्रथमच 153 रुग्ण सापडले आहेत. व 1 बधिताचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. ही बाब भयंकर असून चिंता वाढवणारी आहे.  

फलटण शहरात 72 कोरोना पॉझिटिव्ह

     यामध्ये  फलटण 18 (फक्त फलटण असा पत्ता दिलेले), बुधवार पेठ 12, शुक्रवार पेठ 6, लक्ष्मीनगर 10, मंगळवार पेठ 2,  रविवार पेठ 7, विद्यानगर 1,   पवार गल्ली 1, पाचबत्ती चौक 1, शिवाजी नगर 4, भडकमकरनगर 1,  मलठण 3, रिंग रोड 1, संजीवराजेनगर 2, विवेकानंद नगर 3, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 81 कोरोना पॉझिटिव्ह 

     यामध्ये कोळकी 14, जाधववाडी 8, वडजल 1, ठाकूरकी 3, बरड 1, निंभोरे 1, शिंदेवाडी 4,  विडणी 6, उपळवे 1, झडकबाईचीवाडी 1, तरडगाव 3, कापडगाव 2, सासवड 2, वाठार निंबाळकर 1, सुरवडी 1, मिर्ढे 3, चौधरवाडी 1, आसू 4, तरडफ 1, राजुरी 3, निंबळक 1, काळज 2, राजाळे 2, चव्हाणवाडी 3, वाखरी 1, तांबवे 1, तडवळे 2, हिंगणगाव 2, विठठलवाडी 1, ताथवडा 1, पिराचीवाडी 1, सोमंथळी 1, शेरेचीवाडी 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

 1 बधिताचा मृत्यू

    ताथवडा ता. फलटण येथील 58 वर्षीय महिला या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments