Breaking News

भयंकर! फलटण तालुक्यात आकडा वाढला ; 153 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू

Corona virus phaltan updates : 153 corona positive 

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 7 एप्रिल 2021  - जिल्हा प्रशासनाकडून आज 7 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 153 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 67 व्यक्ती तर ग्रामीण भागात 86 रुग्ण सापडले आहेत.  दुसऱ्या लाटेत आज प्रथमच 153 रुग्ण सापडले आहेत. व एका बधिताचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब भयंकर असून चिंता वाढवणारी आहे.  नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

फलटण शहरात 67 कोरोना पॉझिटिव्ह

     यामध्ये  फलटण 10, रविवार पेठ 12, बुधवार पेठ 7, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, तेली गल्ली 1, जिंती नाका 1, भिमनगर 1,स्वामी विवेकानंद नगर 1, सगुणामाता नगर 1,मलटण 6, पवार गल्ली 1, डेक्कन चौक 1, भडकमकरनगर 1, संजीवराजे नगर 1,कसबा पेठ 2, विद्यानगर 1, बारस्कर गल्ली 1, शंकर मार्केट 2, धनगरवाडा 1,लक्ष्मीनगर 1, मारवाड पेठ 1, शिवाजीनगर 4, नारळी बाग 1,काळुबाईनगर 5, मेटकरी गल्ली 1, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 86 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये चौधरवाडी 1,  धुमाळवाडी 1, माने मळा 1,  रावडी 1, नाईकबोंमवाडी 1, वडले 1, तांबवे 1, वाखरी 1, अलगुडेवाडी 3, कोळकी 7,   ठाकुरकी 1, सासकल 1, वाठार निंबाळकर 3,  विडणी 1, शेरेवाडी 1, बोरावके वस्ती 1, सस्तेवाडी 1, चव्हाणवाडी 1, हुमणगाव 1, जिंती 4, तरडगाव 4, सासवड 1, जाधववाडी 4, टाकुबाईचीवाडी 1, काळज 1, रेवडी खुर्द 1,   पाडेगाव 2,  सोमंथळी 1,  निरगुडी 1, ढवळ 1, विडणी 12, धुळदेव 2, शिंदेवाडी 1, राजाळे 3, मठाचीवाडी 2, बरड 2,  गुणवरे 1, निंभोरे 1, सस्तेवाडी 1, मिरगाव 1, कुर्णेवाडी 1, पिंप्रद 1,  कुसुर 1, मुळीकवाडी 1, गणेशनगर 3,  फडतरवाडी 1, कापडगाव 1, वेळोशी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

1 बधिताचा मृत्यू

फलटण येथील 45 वर्षीय महिला या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments