Breaking News

ताथवडा घाटात दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

        गंधवार्ता वृत्तसेवा फलटण -  ताथवडा घाट परिसरात रात्री फलटण ग्रामीण पोलीस पेट्रोलिंग करत असताना , दरोडा घालण्याच्या तयारीत असणारी सहा जणांची टोळी आढळून आली, पोलिसांनी त्यांना दोन्ही बाजूने घेरले असता, त्यातील 2 इसम फरार झाले उर्वरित चौघांना  पोलिसांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून कोयता, चाकू, मिरची पूड व 2 मोटार सायकल असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 1 मार्च 2021 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस उप निरीक्षक शेख, पो.कॉ. अवघडे ,पो.कॉ. कुंभार व चालक पो.ना. यादव हे पोलिस वाहनात व दुसऱ्या खाजगी वाहनाने , पो. ना. अभिजात काशीद, पो.ना. देवकर पो.कॉ. जगदाळे पो.कॉ. पाटोळे असे तथावडा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना ताथवडा घाटाचे दुसरे वळणावर तिन पल्सर मोटार सायकल व तेथे थांबलेले सहा इसम दिसल्याने, पोलिसांनी त्यांना दोन्ही बाजुनी घेरले असता, सरकारी वाहन पाहुन त्यामधील दोन इसम त्यांच्याकडील मोटार सायकलवरुन पळुन गेले. मात्र पोलिसांनी उर्वरित चार इसम 1) योगेश बाजीराव मदने वय ३० वर्षे रा. राजापुर ता.खटाव जि.सातारा २) सनि ऊर्फ सोन्या धनाजी भंडलकर वय २३ वर्षे रा चौधरवाडी ता.फलटण ३) प्रथमेश ऊर्फ सोनु हणमंत मदने वय २१ वर्ष रा.उपळवे ता.फलटण ४) किशोर हणमंत जाधव वय १९ वर्षे रा ताथवडा ता. फलटण  यांना ताब्यात घेतले. पळून गेलेले इसम नामें ५) महेश ऊर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे वय २५ वर्ष रा मोती चौक फलटण ६) किरण मदने पुर्ण नाव माहित नाही रा. राजापुर ता.खटाव असे एकुण सहा इसम यांनी ८०,०४०/- किंमतीचा माल व हत्यारे जवळ बाळगुन मौजे ताथवडा ता.फलटण गावचे हद्दीत ताथवडा घाटात, दरोडा घालण्याच्या तयारीनिशी एकत्र मिळुन आले व छाप्याचे वेळी १ ते ४ आरोपी यांना जागीच पकडले असुन, त्याचे अजुन दोन साथीदार सरकारी वाहन पाहून त्यांचे मोटार सायकलवरुन घाटातून पळुन गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला परंतु ते  सापडले नाहीत.

        आरोपींकडून एक बजाज कंपनीची काळ्या रंगाची १५० सीसी पल्सर नंबर नसलेली मोटार सायकल, एका प्लास्टीकचे पिशवी मध्ये लाल रंगाची मिर्चा पुड व  एक 12 इंच लांबीचा चाकू सापडला. तसेच आणखी एक बजाज कंपनीची काळे लाल रंगाची 220 सीसी  नंबर प्लेट नसलेली पल्सर मोटार सायकल व एक 18 इंच लांबीचा कोयता एकुण - 80,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

No comments