Breaking News

काँग्रेसच्या फलटण तालुका कार्याध्यक्षपदी आमिर शेख

Aamir Sheikh as Congress Phaltan taluka working president

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण -  राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या फलटण तालुका कार्यकारिणीच्या  पदाधिकारी निवडी नुकत्याच संपन्न झाल्या. फलटण तालुका कार्याध्यक्षपदी आमिर शेख  यांची निवड करण्यात आली  या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

    अमिरभाई शेख हे एक फलटण शहरातील सामाजिक कार्यकर्ते असून सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न घेऊन ते प्रशासन च्या विरोधात आवाज उठवत आहेत. फलटण तालुक्यातील सावकारकी, कोरोना काळातील लाईट बिलाचा प्रश्न, फलटण नगरपरिषद च्या विविध जाचक अटीच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. कोरोना काळात जनतेला अत्यावश्यक सेवा वस्तू, अन्नपदार्थ पुरवण्यात आमिरभाई पुढे होते. याच सर्व  दखल घेऊन त्यांच्यावर कोंग्रेस पक्षाने फलटण तालुका कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

    नियुक्ती प्रसंगी, नूतन पदाधिकारी यांना अभिनंदन  व शुभेच्छा देऊन, आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा  श्रीमती सोनिया गांधी,  खासदार  श्री राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हात बळकट करून सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात व त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची वाढ व विस्तार करणेत पुढाकार घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केले.

No comments