खासदार रणजितसिंह यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव; राष्ट्रपती-पंतप्रधान - रेल्वेमंत्री यांच्यासह अनेकांनी दिल्या शुभेच्छा
![]() |
खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल |
On the occasion of Ranjit Singh's birthday, the President-Prime Minister-Railway Minister and many more wished
फलटण - माढा लोकसभा मतदार संघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविन्द, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या. माढा लोकसभा मतदार संघ व सातारा जिल्ह्यातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
![]() |
| दिल्ली येथे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले |
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस असला तरी ते महत्वपुर्ण पक्षीय बैठकीसाठी दिल्ली येथे असल्याने फलटण येथे ते कार्यकर्त्यांच्या व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु तरीही फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदार संघामध्ये ठिकठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने खा. रणजितसिंह यांना राष्ट्रपती रामनाथ कोविन्द, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे विशेष शुभेच्छा दिल्या. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी त्यांना प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या, तर दुरध्वनीद्वारे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा, जे पी नड्डा, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार छ. उदयनराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार जयराम स्वामी, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार राहुल कुल, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, सोलापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख, सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष विक्रम पावस्कर आदींसह विविध विभागाचे शासकीय अधिकारी, पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.



No comments