आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त फलटण नगर परिषदेत अभिवादन
फलटण (प्रतिनिधी ) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांंची जयंती फलटण नगरपरिषदे मध्ये साजरी करण्यात आली.
आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्य सरकारने थोर पुरूषांच्या यादीत समावेश केल्याने आज 20 फेब्रुवारी 2021 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांंची 209 वी जयंती प्रथमच राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जात आहे. उशिरा का होईना सरकारने बाळशास्त्री जांभेकरांचा थोर व्यक्तीच्या यादीत समावेश करून त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मराठी पञकार परिषद पञकार कल्याण निधी वगैरे विविध पत्रकार संघटनांकङून राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. फलटण नगरपरिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष पांङूरंग गुंजवटे , नगरसेवक आणि मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय माळवे , नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, असिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी, दादासाहेब चोरमले, राहुल निंबाळकर,पत्रकार बाळासाहेब ननावरे नगरपरिषदेचे अधिकारी , कर्मचारी उपस्थीत होते.

No comments