सातारा जिल्ह्यात 85 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 325 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 12 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 85 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 325 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
325 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 48, कराड येथील 56, फलटण 13, कोरेगाव येथील 27, वाई येथील 34, खंडाळा येथील 2, रायगाव येथील 6, पानमळेवाडी येथील 48, महाबळेश्वर येथील 25, दहिवडी 31, म्हसवड येथील 3, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 32 असे एकुण 325 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -325477
*एकूण बाधित -57297
*घरी सोडण्यात आलेले -54648
*मृत्यू -1835
*उपचारार्थ रुग्ण-814
No comments