आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच - डोंबळवाडी ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर खुलासा
![]() |
| डोंबाळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली |
फलटण दि. 23 जानेवारी 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले असतानाच, बिनविरोध निवडून आलेल्या फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन, आम्ही राजे गटाचे नेतृत्व मानत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही निवडून आलो आहे, आमचा दुसऱ्या पक्षाशी काही संबंध नसल्याचा खुलासा जाहीर पत्र देऊन केला आहे.
![]() |
| श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे जाहीर खुलास्याचे पत्र देताना |
डोंबाळवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रात म्हटले आहे की, फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी ग्रामपंचायत ची नुकतीच सन 2020- 2025 या कालावधीकरिता निवडणूक बिनविरोध करण्यात आली असून, आम्ही सर्व नवनिर्वाचित बिनविरोध निवडून आलेले 7 सदस्य जाहीर निवेदन करतो की, आम्ही डोंबाळवाडी ग्रामपंचायत निवडणूक, विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, राजे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आलो आहोत. असे जाहीर करीत आहे. आम्हा सर्वांचा कोणत्याही दुसर्या पक्षाचा, गटाचा, व्यक्तीचा संबंध नाही. असा खुलासा स्वखुशीने करीत असल्याचे पत्रात म्हटले आहे आणि पत्राच्या खाली किरण हणमंत ढोणे, सौ. स्वाती जालिंदर येळे, सौ. राणी विकास डोंबाळे, तुषार प्रताप पिसाळ, सौ. मोनिका तुकाराम सुळ, पांडुरंग बिरा कोळपे, सौ. नकुसाबाई मारुती कोळेकर यांच्या सह्या आहेत.



No comments