ब्रिटनमधून महाराष्ट्रात आलेल्या 8 जणांना नवीन कोरोनाची बाधा
गंधवार्ता वृत्तसेवा दि. 4 जानेवारी - ब्रिटन मधून भारतात परतलेल्या प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील आठ प्रवाशांचा समावेश आहे. या 8 जणांना नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून सध्या त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटर द्वारे सदरची माहिती प्रसिद्ध केली आहे यामध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.#CoronaVirusUpdates


No comments