Breaking News

भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त शिशू केअर युनिटची आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून पाहणी

Minister of State for Health Rajendra Patil Yadravkar inspects the child care unit at Bhandara District Hospital

        मुंबई, दि. 9 : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला (एसएनसीयू) लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची दखल घेत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तात्काळ भंडारा येथे जाऊन रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी केली. तसेच त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतानाच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

        अशा दुर्घटना घडू नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांना खबरदारीच्या उपायांची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच आवश्यक ते निर्णय घेतले जातील असे राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांची वीज यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणेची तात्काळ तपासणी करण्याच्या सूचना राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

No comments