Breaking News

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार : सहायक आयुक्त

If the student is deprived of the scholarship, action will be taken against the principal and staff of the concerned college

   सातारा   (जिमाका) : महाडिबीटी पोर्टलवरील अनु. जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांचे सन 2018-19 व 2019-20 मधील मंजुर शिष्यवृत्तीची रक्कम आधार कार्ड अद्ययावत नसणे तसे आधार बँक खत्याशी संलग्न नसल्या कारणाने शिष्यवृत्ती मंजुर होवुनसुध्दा प्रलंबित आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी‍ विद्यार्थ्यांकडुन आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करुन घेऊन कागदपत्रांची पुर्तता करुन  करुन या कार्यालयाकडे मंजुरीसाठी तात्काळ पाठवावेत अशा सुचना सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिल्या.

            जिल्ह्यातील 351 महाविद्यालयाचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

            सन 2019-20 मधील एकुण 3033 विद्यार्थ्यांचे अर्ज दुसऱ्या हप्त्यासाठी अल्पाय करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या हप्त्याची रक्कम विद्यार्थी, महाविद्यालय यांच्या खात्यावर वर्ग होणर नाही . त्यासाठी महाविद्यालयांनी दुसऱ्या हप्त्यासाठी अल्पाय करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. शैक्षणिक वर्ष 2020-12 या वर्षामध्ये महाडिबीटी  पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 3 डिसेंबर 2020 पासुन सुरु झली आहे. याबाबत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देवुन विद्यार्थ्यांकडुन अर्ज भरुन घ्यावेत. महाविद्यालयाने कार्यवाही न केल्यास व त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी सांगितले.

No comments