राजाळे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कृषि विभागा मार्फत अभिवादन कार्यक्रम संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कृषि विभागा मार्फत राजाळे ता. फलटण जिल्हा सातारा येथे महिला शेतकऱयांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कृषी सहाय्यक सचिन जाधव यांच्यासह परिसरातील महिला वर्ग व शेतकरी उपस्थित होते.
अभिवादन कार्यक्रम झाल्यानंतर कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारा यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या खोडवा उसाचा पाचट व्यवस्थापन तंत्रज्ञान माहीती पत्रक वार्ताफलक वरती प्रचार व प्रसिध्द पत्रक लावण्यात आले व खोडवा पाचट व्यवस्थापन बाबत यावेळी श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक यांनी माहिती दिली.

No comments