Breaking News

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना

 

गंधवार्ता वृत्तसेवा  (दि. 2 ऑक्टोबर 2020)  - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मिलेनिया यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोविड चाचणीबाबत स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर ट्विट करून म्हटले आहे की, आज रात्री, फ्लोटस आणि माझी कोविड ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही ताबडतोब होम क्वारंटाईन होऊन, उपचार सुरू करत आहोत. बरे होऊन पुन्हा एकत्र भेटू.  

मिलेनिया ट्रम यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की आमची कोवीड चाचणी सकारात्मक आल्यामुळे, आम्ही झालो आहोत, आमची तब्येत सध्या उत्तम आहे, कृपया सर्वांनी सुरक्षित रहा. लवकरच आपण सर्व एकत्र भेटू. 


No comments