मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात २३ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी परिषद

State-wide conference for Maratha reservation on September 23 in Kolhapur
कोल्हापूर दि. 14 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी २३ सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. दरम्यान, १ ऑक्टोबर पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास राज्यातील आमदार व खासदार यांच्या पुतळ्यांचे प्रतिकात्मक दहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे. यावेळी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष यांनी असे सांगितले की, गेली पंचवीस वर्षे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक मोर्चे निघाले. ५० पेक्षा अधिक मराठा बांधवांनी बलिदान दिले. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्याला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकार आपली भूमिका मांडण्यात कमी पडल्यामुळे ही वेळ आली आहे. यामुळे असंतोष पसरला आहे. आता मराठा समाजाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे.
No comments