Breaking News

Covid-19 : रिकव्हरी रेट वाढू लागला

 

Covid-19: Recovery rate increased

        गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 24 सप्टेंबर 2020) - शासकीय स्तरावर राबविण्यात आलेल्या कोरोना विषयक धोरणामुळे व उपाययोजना मुळे भारतातील व महाराष्ट्रातील कोविड रुग्ण बरे होण्याची संख्या वाढू लागली आहे. देशातील व राज्यातील कोविड रिकव्हरी रेट वाढू लागल्यामुळे (Covid-19: Recovery rate increased) सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

         भारताचा विचार केला तर गेल्या 24 तासात देशात 87 हजार 374 इतके रुग्ण बरे झाले तर एकूण 80 हजार 508 रुग्णांना कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले  एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 46.7 लाख (46,74,987) इतकी झाली असून, बरे होण्याच्या दराने 81. 55 % टक्क्यांचा आकडा पार केला आहे. नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत वाढत असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसारित केली आहे. 

        तर महाराष्ट्रात आज दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी 17 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून, आज 19,164 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यभरात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 लाख 73 हजार 214 वर पोहोचली असून,  राज्याचे बरे होण्याचे प्रमाण 75.86 % टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या 2 लाख 74 हजार 993 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने  प्रसारित केली आहे.

No comments