Breaking News

फलटण शहर बंद बाबत गोंधळाचे वातावरण

        

       Confusion over Phaltan city closure

  फलटण :- दि १२ सप्टेंबर ते दि १७ सप्टेंबर फलटण शहर पूर्ण बंद ठेवण्याचा फलटण व्यापारी संघटना यांनी निर्णय घेतला असलेबाबतचा एक मेसेज फलटण तालुक्यातील सोशल मीडियावर वायरल करण्यात आला याबाबत प्रशासनास विचारात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. 

        "दि ६ रोजी फलटण येथे झालेल्या व्यापारी संघटनेच्या मीटिंगमध्ये दिनांक १२ ते १७ सप्टेंबर पर्यंत फलटण शहर पूर्ण चा बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने झाला असून मेडिकल व खत बियाणे यांची दुकाने सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत खुले राहतील बाकी इतर सर्व व्यवहार बंद राहतील तसेच दिनांक १८ सप्टेंबर पासून सर्व व्यवहार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करून या संकटाचा नायनाट करण्याचा संकल्प करु या फलटण व्यापारी संघटना" असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असता फलटण तालुक्यात सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महसुल विभाग, पोलीस विभाग, नगर परिषद तसेच आरोग्य विभाग यांना विचारात घेऊन अथवा अवगत न करता फलटण बंदचा निर्णय घेण्यात आला असून यावर प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी याबाबत प्रशासनाकडून शहर बंद चे निर्देश नसून व्यापारी संघटनेच्या बैठकामध्ये झालेला निर्णय असल्याचे दिसून येते असा खुलासा केल्याने फलटण बंद होणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

        सध्या जिल्ह्यात सर्वत्र आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून फलटण व्यापारी संघटना या नावाने  फलटण बंदचा निर्णय घेऊन  स्थानिक प्रशासनाला याबाबत विश्‍वासात न घेता तसेच याबाबत अवगत न करता सोशल मीडियावर या बाबत निर्णय जाहीर झाल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने स्थानिक प्रशासनही खडबडून गेले असून, मुळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत स्थानिक प्रशासन अथवा जिल्हा प्रशासन यांच्या पूर्वपरवानगीशिवाय अथवा त्यांना अवगत न करता असा बंद चा निर्णय घेणे योग्य आहे का असा सवाल नागरीकांना पडला असून सदरचा फलटण बंदचा घेण्यात आलेला निर्णय हा एकतर्फी असल्याचे चित्र असून फलटण व्यापारी असोशियन तर्फे  घेण्यात आलेल्या फलटण बंद चा निर्णय योग्य व नियमास धरून आहे का नसेल तर यावर प्रशासन काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून दिनांक १२ ते १७ सप्टेंबर फलटण बंद राहणार की प्रशासन याबाबत दुसरा कोणता निर्णय घेऊन फलटण बंदचा निर्णय रद्द करून यावर कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments