Breaking News

सातारा जिल्ह्यात 761 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1209 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

        सातारा दि. 14 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 761 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1209 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 1209 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 31, उपजिल्हा रुग्णालय फलटण 68, कोरेगाव 61, वाई 160, खंडाळा 147, रायगांव 121, पानमळेवाडी 80, मायणी 214, महाबळेश्वर 49, पाटण 41, दहिवडी 50, तळमावले 25 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 246 असे एकूण  1209 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --57369

एकूण बाधित -- 24578

घरी सोडण्यात आलेले -- 15594

मृत्यू -- 690

उपचारार्थ रुग्ण -- 8294

No comments