फलटण तालुक्यात आणखी 35 कोरोना पॉझिटिव्ह ; दिवसभरात एकूण 52 रुग्ण

52 corona positive in Phaltan taluka
फलटण 6 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज दि. 6 सप्टेंबर 2020 रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण शहर व तालुक्यात आणखी 35 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आज जाहीर केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 52 झाली आहे. रात्री उशिरा जाहीर केलेल्या 35 रुग्णांमध्ये फलटण शहरात 23 व ग्रामीण भागात 12 रुग्णांचा समावेश आहे. रात्री जाहीर केलेले अहवाल हे दि. 6 सप्टेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे अहवाल असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
दि. 6 सप्टेंबर रोजी केलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये 35 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. यामध्ये
फलटण शहरात
शनी नगर शुक्रवार पेठ येथील 3 व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये 37 वर्षीय, 63 वर्षीय, पुरुष 58 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
लक्ष्मी नगर येथे 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये ते 52 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
सगुणामाता नगर, मलटण येथे त30 वर्षीय पुरुष, 52 वर्षे पुरुष, माता रमाई चौक, मंगळवार पेठ येथे 45 वर्षीय महिला, जुना बारामती रोड मंगळवार पेठ येथे 60 वर्षे पुरुष, शिवाजीनगर फलटण येथे 74 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथे 44 वर्षीय पुरुष, कसबा पेठ येथे 36 वर्षीय पुरुष, गजानन चौक येथे 65 वर्षीय महिला आणि फलटणच्या इतर भागात एकूण 9 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, यामध्ये 39 वर्षीय,23 वर्षीय, 20 वर्षीय, 21 वर्षीय,29 वर्षीय, 65 वर्षे पुरुष, 5 वर्षीय बालक, 40 वर्षीय, 28 वर्षीय महिला यांचा समावेश आहे
ग्रामीण भागात
मोरेवस्ती अलगुडेवाडी येथे 50 वर्षीय पुरुष, खटकेवस्ती गवळीनगर येथे 55 वर्षीय पुरुष, तांबमाळ येथे 39 वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथे 62 वर्षीय महिला, रावडी खुर्द येथे 42 वर्षे पुरुष, होळ येथे 66 वर्षे पुरुष, जिंती येथे 75 वर्षीय पुरुष, सस्तेवाडी येथे 62 वर्षीय महिला, बिरदेव नगर जाधववाडी येथे 74 वर्षीय पुरुष, निंबळक येथे 34 वर्षीय पुरुष, गणेश नगर साखरवाडी येथे 58 वर्षीय महिला, सरडे जाधववस्ती येथे 32 वर्षीय पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
तर आज दुपारी जाहीर केलेले 18 रुग्ण यामध्ये ग्रामीण भागात 16 रुग्ण व शहरात 1 रुग्णाचा समावेश आहे.
ग्रामीण भागामध्ये
तामखडा येथे 5 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 42 वर्षीय, 17 वर्षीय, 25 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय, 41 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
वाठार येथे 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 16 वर्षीय, 51 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तरडगाव येथे 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 40 वर्षीय, 65 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
शिंदेमळा येथे 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 28 वर्षीय, 85 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
बरड येथे 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 15 वर्षीय, 16 वर्षीय मुलांचा समावेश आहे.
निरगुडी येथे 50 वर्षीय पुरुष, पिंपळवाडी येथे 42 वर्षीय पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
फलटण शहरामध्ये स्वामी विवेकानंद नगर येथे 43 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
No comments