कोरोना गाथा - पुरी करा आता
या कोरोनाची भीती जास्त आणि धोका कमी, अशी भानगड आहे. प्रत्येकाने आता नवीन उमेदीने स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेऊन, आपण परत पूर्वपदावर येणे अत्यंत आवश्यक आहे. - डॉ. प्रसाद जोशी
आपण सर्व जण आणि सर्व जग हे गेले ५ महिने ह्या कोरोना महामारी चे शिकार बनलो आहोत किंबहुना पुरते त्यात अडकलो आहोत. सर्वच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. छोटे धंदे बंद पडले आहेत, बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत , रोजंदारीवर काम करणारे सर्वच लोक घरी बसून आहेत, ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे.
५ महिन्या नंतर मागे वळून बघताना आता असे वाटते की खरच या कोरोना महामारीचा एवढा बवाल करण्याची गरज होती का ? पहिले ३ महिने lockdown झाल्या नंतर हळूहळू ते आत्ता पर्यंत पूर्णपणे उठवणे शक्य होते का ?प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, राज्याची आणि भारत देशाची आर्थिक उलाढाल अत्यंत कमकुवत झाली आहे. मोदीजींनी बऱ्याच नवीन योजना आणल्या खऱ्या, पण प्रत्यक्षात त्या किती लागू होत आहेत देवच जाणे. हळूहळू पण लवकरच जीवन मूळ पदावर येणे अत्यंत गरजेचे आहे. परत सर्व छोटे -मोठे धंदे जोमाने उभे राहणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास अराजकता माजेल यात काही शंकाच नाही.
या कोरोनाची भीती जास्त आणि धोका कमी अशी भानगड आहे. प्रत्येकाने आता नवीन उमेदीने स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेऊन आपण परत पूर्वपदावर येणे अत्यंत आवश्यक आहे. माझेच उदाहरण सांगायचे झाले तर lockdown declare झाल्यापासून जोशी हॉस्पिटल एकही दिवस बंद न्हवते , आम्ही आजतागायत दर आठवड्याला साधारण ४०० patients तपासत आहोत आणि ३० ऑपरेशन्स करत आहोत. या ५ महिन्यात आम्ही आत्तापर्यंत ६००० opd patients तपासले आणि ६०० surgeries केल्या .मला सांगायला अभिमान वाटेल की या ४ महिन्यात आम्ही १०० हून अधिक सांधे-रोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. हे सर्व करत असताना स्वतःची आणि सर्व स्टाफ ची पूर्ण काळजी घेऊन योग्य ती खबरदारी घेऊन अविरत काम चालु ठेवले आहे.
आता तुम्ही म्हणाल की परत काम सुरू करताना योग्य काळजी घेऊन सुद्धा कोरोना झाला तर? अहो मग होऊ द्या की, कारण आता आम्ही बघत असलेल्या बऱ्याच patients ना या दोन तीन महिन्यात सर्दी, खोकला , ताप , तोंडाची चव जाणे अशी लक्षण होऊन गेली आहेत आणि त्यांची Antibody Test केल्यास असे आढळते आहे की, त्यांना कोरोना होऊन गेला आहे पण ते आता पूर्ण बरे झाले आहेत.
त्यामुळे आता सकारात्मकता ठेवून, चल-जीवन सुरू करण्याची वेळ आली आहे.
आपल्या सरकार नी आता काय करावे!
- सप्टेंबर पासून सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी.
- सर्व वाहतूक योग्य ती काळजी घेऊन हळूहळू सुरू करावी.
- कोरोना पोसिटीव्ह रुग्ण जरी असला तरी त्याला(patient)ला काही लक्षणे नसतील तर त्यांना होम quarantine करण्यात यावे.
- सर्व सरकारी योजना या तळागाळापर्यंत पोहोचतील याची दक्षता घ्यावी.
- ज्यांनाच फक्त त्रास आहे अशा लोकांना ऍडमिट करून त्याच्या आर्थिक क्षमते नुसार सरकारी अथवा private हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावेत म्हणजे मेडिकल fraternity चा ताण एकदम कमी होईल.
आपण स्वतः काय करावे -
- आपण एक सुज्ञ नागरिक या नात्यानी सर्व नियमांचे पालन करावे. (प्रत्येकाने मास्क वापराणे अत्यंत महत्वाचे आहे .)
- स्वतः वर विश्वास ठेवून आपले काम जोमाने सुरू करावे .
- न घाबरता आपला व्यवसाय पूर्ववत कसा होईल या कढे लक्ष द्यावे.
- शक्य असल्यास दुसऱ्याला मदत करावी .

कोरोना नी आपल्याला काय शिकवले-
- अति तेथे माती .
- आपल्या कुटुंबाचे स्नेह बंध आणखीन बळकट झाले.
- आपल्या सुप्त कलागुणांची आपल्यालाच ओळख पटली .
- तेच काम शिस्थ बद्ध केल्यास किती पटकन होते याची आपल्याला प्रचिती करून दिली.
- या विश्वात आपण किती क्षुद्र आहोत याची परत एकदा जाणीव करून दिली.
तर मित्रांनो, जीवन हे असेच पुढे जाणार आहे, आपल्याला कोरोना बरोबर राहायला शिकले पाहिजे, सकारात्मकता ही आपली मोठी ढाल आहे.
"मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार "
जय हिंद , जय भारत
No comments