Breaking News

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

 

        महाड: महाडमध्ये एक पाच मजली इमारत कोसळली आहे. आज सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली असून ढिगाऱ्याखाली १०० ते १५० लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे १५० ते १७५ रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली आहे. मात्र, अंधार पडू लागल्याने मदतकार्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे.

        या इमारतीत एकूण ४८ ते ५० कुटुंब राहत होते. एकूण २०० ते २२५ लोक या इमारतीत राहत असल्याने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १५० पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही इमारत ७ ते ८ वर्षांपूर्वीच बांधलेली होती. एवढी नवीन इमारत असतानाही ही इमारत कोसलळ्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

No comments