Breaking News

जी. एल. देशपांडे सरांचे वृद्धापकाळाने निधन

 

        फलटण  - मुधोजी हायस्कूलमध्ये सलग ३५ वर्ष ज्ञानदान केलेले माजी शिक्षक गोविंद लक्ष्मण देशपांडे उर्फ जी एल (वय ८१) यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले. शहरातील गोंदवलेकर महाराज नामसाधना आरती मंडळाचे ते सलग ३० वर्ष अध्यक्ष होते.तसेच गिरवी नाक्यावरील स्वामी समर्थ मंदीरातही त्यांनी सेवा केलेली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, विवाहित मुलगा असा परिवार आहे. 

No comments