यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करूया : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
Let's celebrate this year's Ganeshotsav simply: Revenue Minister Balasaheb Thorat
मुंबई, दि.२१ : गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा. कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात ‘मिशन बिगीन अगेन‘ करण्यात आले असले तरी आपण सगळ्यांनी यापुढील काळातही काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी आपण आपल्या सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करूया. जगावर आलेले हे संकट टळूदे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान होऊ दे, अशी प्रार्थनाही गणरायाला आपण सर्वांनी करूया असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
श्री. थोरात म्हणाले की, आज फक्त भारतापुढे नाही, तर जगासमोर कोविड-१९ चे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी स्वयंशिस्त आणि संयम दाखवित येणाऱ्या काळातही आपल्या सर्वांना एकजुटीने परिस्थितीशी सामना करूया. दरवर्षी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने आपण गणेशोत्सव साजरा करतो परंतु यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना एकूण जगावर, देशावरचे कोविड-१९ संकट आपल्याला माहित आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपती यांनी साधेपणाने साजरा करावा. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करताना गणेशोत्सव काळात कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याचे टाळूया. आपल्या मनामध्ये भावना आणि सामाजिक भान ठेवून उत्सव साजरा करूया.
No comments