Breaking News

रयतच्या माजी विद्यार्थ्यांचा लोणंद येथे 'दोस्ती पार्क' हा नाविण्यपूर्ण उपक्रम


            लोणंद दि. 6 ऑगस्ट ( गंधवार्ता वृत्तसेवा) - येथील रयत शिक्षण संस्थेच्या  मालोजीराजे विद्यालय लोणंद आणि न्यू इंग्लिश  स्कूल (मुलींचे) लोणंद  या शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या  सन १९९३ च्या दहावीच्या एकत्रित बॅचच्या संयुक्त प्रयत्नाने   लोणंद व परिसरात अनेक  समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत . 
            या ग्रुपच्या माध्यमातून लोणंद परिसरात ठोंबरे मळा या ठिकाणी  "दोस्ती पार्क" नावाचा एक नाविण्यपूर्ण उपक्रम साकारला जात आहे. याचा शुभारंभ   "आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचे" औचित्य साधून वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी आंबा , तैवान पेरु  , चिक्कू , आवळा , जांभूळ ,लीची ,सुपारी , काश्मिरी अपलबोर, वड, पिंपळ, बेल, अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली . या उपक्रमामधे डों. सागर वर्धमाने, आशिष शहा, अजित गवळी, जयेश दोशी, शकील इनामदार,  उदय धामणकर,  विशाल जाधव ,तुषार  शहा,संतोष करंजे, अमोल ठोंबरे,राहुल घाडगे या सदस्यांनी तसेच समीर,रिदम, मयंक,परी या लहान मुलांनी सहभाग घेतला. लवकरच गृपमधील इतर सदस्यही याठिकाणी येऊन वृक्षारोपण करणार आहेत.


No comments