Breaking News

इंधन दरवाढीविरुद्ध फलटण येथे उद्या काँग्रेसचे धरणे आंदोलन - महेंद्र सूर्यवंशी (बेडके)



         फलटण दि. २ : केंद्र शासनाने डिझेल, पेट्रोल इंधनाच्या केलेल्या अन्यायकारक दरवाढीबाबत फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवार दि.३ जुलै रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.
        माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, नगरसेवक सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने हे धरणे आंदोलन छेडण्यात येणार असून फलटण तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, सर्वसामान्यांच्या या प्रश्नाबाबत होणारे हे आंदोलन महत्वाचे असल्याचे महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

No comments