Breaking News

सख्खा भाऊ पक्का वैरी! दुधेबावी येथे जमिनीच्या वादातून भावाचा खून


        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  जमीन वाटपाच्या वादातून दुधेबावी तालुका फलटण येथे झालेल्या भांडणात, भाव- भावजय व 2 पुतन्यांनी  कुऱ्हाड, लोखंडी गज यांनी वार करून धाकट्या भावास गंभीर जखमी केले. जखमी भावावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने चौघाजणांवर खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

        ज्ञानदेव सोनवलकर  आणि हनुमंत सोनवलकर हे भाऊ दुधेबावी ता फलटण येथे शेजारी शेजारी राहत होते. त्यांच्यात जमीन वाटपा बाबत वाद होता.  ज्ञानदेव सोनवलकर यांच्या पत्नी अनिता ज्ञानदेव सोनवलकर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 3 जुलै 2020 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास  माझे पती ज्ञानदेव सोनवलकर व दिर हणमंत सोनवलकर व त्याची बायको यांच्यात वाद झाला होता, आम्ही त्यांचेकडे दुर्लक्ष करून पोलीस ठाणेत तक्रार दिलेली नव्हती.

        दि. 4 जुलै 2020 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अनिता ज्ञानदेव सोनवलकर या घरातील कामे करीत असताना,  दिर हणमंत सोनवलकर हा व त्याचे सोबत त्यांची पत्नी सुनिता, त्याचा मुलगा अनिकेत व शंभुराज असे आमचे घरासमोर आले. हणमंत महादेव सोनवलकर यांनी त्यांचे हातातील लोखंडी पाईपने माझे पतीस मारहाण केली. व सुनिता हणमंत सोनवलकर हिने शिवीगाळ केली.  तसेच अनिकेत हणमंत सोनवलकर यांने त्याचे हातातील कु-हाड माझे पतीचे उजवे हाताचे दंडावर मारली व शंभुराज हणमंत सोनवलकर यांने त्याच्या  हातात असलेल्या लोखंडी गजाने माझे पतीचे डोक्यात मारले.  उपरोक्त सर्व रा दुधेबावी ता. फलटण या सर्वांनी मिळुन माझ्या पतीस मारहाण करून गंभीर दुखापत केली असल्याची तक्रार अनिता सोनवलकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

        दरम्यान ज्ञानदेव सोनवलकर हे फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन पावल्याने त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चौघांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भादविसं कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

No comments