Breaking News

पाडेगाव फार्म येथे 2 कोरोना बाधीत; एका बधिताचा मृत्यू

      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यातील पाडेगाव फार्म येथील दोन व्यक्तींच्या कोविड 19 चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या असून यापैकी एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे

        पुणे येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मुलाच्या संपर्कातील पाडेगाव फार्म येथील मुलाचे आई व वडील यांची कोविड 19  चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. पुणे येथे कोरना पॉझिटिव्ह आलेला मुलगा दि. 29 जून 2020 ते 1 जुलै 2020 रोजी पाडेगाव ता. फलटण येथे वास्तव्य करून गेला होता. त्याच्या संपर्कात आल्याने त्याचे आई-वडील बाधित झाले.  52 वर्षीय महिला (आई) व 62 वर्षीय पुरुष (वडील) यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यापैकी 62 वर्षीय पुरुष या बाधित व्यक्तीचा दि. 8 जुलै 2020 मृत्यू झाला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

No comments