Breaking News

न्यू इंग्लिश स्कूल सातारच्या 2 विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुयश

फोटो ..अतुल देशपांडे, सातारा

       सातारा -  रोटरी क्लब कराड यांच्या वतीने जून महिन्यात कोरोना या विषयावर भव्य पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती .या स्पर्धेत संपूर्ण देशातून लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेच्या प्राप्त निकालानुसार सातवी / आठवीच्या गटांमध्ये चि. मंदार महेश लोहार, इयत्ता आठवी या विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. .तसेच इयत्ता नववी / दहावीच्या गटांमध्ये कु. श्रीया किरण प्रभुणे इयत्ता दहावी हिचा द्वितीय क्रमांक आलेला दोन्ही विद्यार्थी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेचे आहेत.  या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 750 / -रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन संस्थेमार्फत गौरवण्यात आले आहे. शाळेच्या या उज्वल यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक कलाशिक्षक  घनश्याम नवले व संदीप माळी यांचे शालेय समितीचे अध्यक्ष  अमित कुलकर्णी शालेय समिती सदस्य  अनंत जोशी शालाप्रमुख सुनील शिवले उपशाखाप्रमुख सौ सुनीता राव पर्यवेक्षक सुजाता पाटील व विनया कुलकर्णी यांनी कौतुक अभिनंदन केले.


No comments