श्रीराम बझारमध्ये पेण येथील आकर्षक व सुबक गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - गेली ४० वर्ष ग्राहक हा केंद्रबिंदू मानुन ग्राहकांना चांगल्या प्रकारची व अखंडपणे सेवा देवून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्रीराम बझारने विक्रीचे नवे उच्चांक केले आहेत.
यावर्षीचा गणेशोत्सव हा गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी, या हिंदू संस्कृतीच्या पद्धतीनुसार १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ अखेर साजरा केला जाणार आहे. या सणाचे औचित्य साधून श्रीराम बझारचे मुख्य कार्यालयामध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ऑगस्टच्या पहिल्या आठवडयापासून पेण येथील आकर्षक व सुबक गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध केलेल्या आहेत.
सदरच्या मूर्तीमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीच्या १ फूट पासून ते ३ फूट उंची पर्यंतच्या मूर्ती उपलब्ध असून त्यामध्ये फेटाधारी, लालबाग राजा, दगडू शेठ, मसुरी, किरीट, बालगणेश, तसेच उंदीर, हंस, यावर आरूढ झालेल्या गणेशमूर्ती, आकर्षक गौरी मुखवटे व सजावट साहित्य ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. ग्राहकांमध्ये गणेशमूर्ती बुकिंग करीता उत्साह असून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती बुकिंग सुरु आहे.
भाऊ बहिणीच्या नात्याची महती सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन । या खास रक्षाबंधन सणासाठी विविध प्रकारच्या आकर्षक कलाकृतीच्या राखी विक्रीस उपलब्ध आहेत. ग्राहकांना या वर्षीच्या या दोन्ही सणांची खरेदी श्रीराम बझार मधून करणेचे आवाहन श्रीराम बझारचे वतीने करणेत आले आहे.

No comments