यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६७ वा स्मृतिदिन संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि १० - शनिवार दिनांक ९ मे, २०२६ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज फलटण या चारही शाखांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६७ वा स्मृतिदिन संपन्न झाला.
सुरुवातीस श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके) , महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार मुगुटराव कदम सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक व शिक्षक मनोगतातून प्रा. श्री यादव एस डी यांनी कार्यक्रमाचा हेतू ,उद्देश व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील अनेक शैक्षणिक व सामाजिक प्रसंग सांगितले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपल्या मनोगतातून श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ऋणानुबंध आपल्या मनोगतातून व्यक्त केला व गतकाळातील अनेक आठवणी या दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दलच्या सांगितल्या.
आजच्या पिढीने कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आचरणात आणून पुढे घेऊन जावेत अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या प्राचार्या मा. सौ. गायकवाड एन एम ,उपप्राचार्य मा श्री घनवट पी. डी. व पर्यवेक्षिका सौ गायकवाड सी. आर. यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री यादव एस डी.तर आभार प्रा. राऊत एस एन यांनी मानले.

No comments