Breaking News

जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

Bogus doctor search campaign should be implemented effectively in the district - District Collector Santosh Patil

    सातारा दि. ४ - पोलिस विभाग आणि आरोग्य विभागाने जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम प्रभावीपणे राबवावी.  बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, असा सूचना  जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

     बोगद डॉक्टर नियंत्रणासाठीच्या जिल्हासतरीय समितीची बैठक
 जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी या सूचना दिल्या.

    नागरिकांना बोगस डॉक्टर विषयी माहिती समजल्यास त्यांनी  नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी.  तसेच पोलीस विभागानेही मोहिमेमध्ये स्थानिक पोलिस पाटील यांना प्रशिक्षण देऊन सहभागी करून घ्यावे पॅथॉलॉजी लॅबची ही तपासणी करावी. यासाठी पोलिस व आरोग्य विभागाने शोध मोहीम राबवावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या.

No comments