तडीपार इसमास फलटण शहर पोलीसांनी केले जेरबंद
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ - दिनांक २६/०४/२०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस निरक्षक नितीन नम, श्रेणी उ.प.नि. भोसले, स.पो.फौ. बारेला, पो.हवा. संतोष नाळे, पो.कॉ. अतुल बडे, पो.कॉ. जितेंद्र टिके असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना स.पो.नि. नम यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली कि, पोलीस ठाणे अभिलेखावरील एक तडीपार इसम हा गजानन चौक, फलटण या ठिकाणी फिरत आहे, अशी माहिती प्राप्त झाल्याने, नमुद पोलीस पथकाने गजानन चौक येथे जावुन तडीपार इसमाचा शोध घेतला असता, संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका, सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातुन दोन वर्षा करीता तडीपार असलेला इसम नामे तौसिफ ऊर्फ छोट्या अब्दुल शेख वय ३२ वर्षे, रा. गोल्डन बेकरी पाठीमागे, गजानन चौक, फलटण, ता. फलटण, जि. सातारा हा त्याच्या राहते घरी गजानन चौक फलटण येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन, फलटण शहर पोलीस ठाणेत आणुन, त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनीय कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक सो सातारा, श्री विशाल खांबे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो फलटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी श्री अरविंद काळे, सहा पोलीस निरक्षक नितीन नम, श्रेणी उपनि भोसले, सपोफौ बारेला, पो.हवा. संतोष नाळे, पोकॉ अतुल बडे, पोकों जितेंद्र टिके यांनी पूर्ण केली आहे.

No comments