Breaking News

फलटण मध्ये 'गोविंद चषक' भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा ; ३ मे पासून प्रारंभ

'Govind Cup' Grand Leather Ball Cricket Tournament in Phaltan; Begins on May 3rd.

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ : फलटण एज्युकेशन सोसायटी आणि क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “गोविंद चषक” अंतर्गत १२ वर्षांखालील (U-12) व १४ वर्षांखालील (U-14) गटांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.३ मे ते २० मे २०२६ या कालावधीत फलटण येथील माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, शिंगणापूर रोड, फलटण येथील मैदानावर पार पडणार असून, यंदा या स्पर्धेचे तिसरे पर्व साजरे होत आहे.

सातारा जिल्ह्यात U-12 गटासाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करणारा हा पहिलाच उपक्रम ठरत असून, यामुळे लहान वयातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ मिळणार आहे.

या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित क्रिकेट अकॅडमींचा सहभाग असून, अंडर-12 गटासाठी ड्रॉ (सोडत) जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार गट अ :क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘बी’,अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमी,क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘ए’,नेरळकर क्रिकेट अकॅडमी औरंगाबाद,

गट ब : प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी, सातारा,क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘सी’,राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमी, बारामती स्मॅशर्स, 

तर अंडर 14 गटासाठी ड्रॉ (सोडत) 

गट अ : सारा क्रिकेट अकॅडमी, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘सी’,मिलिंद गुंजाळ स्पोर्ट्स अकॅडमी, बारामती स्मॅशर्स, राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमी,

गट ब : रायझिंग क्रिकेट अकॅडमी, नेरळकर क्रिकेट अकॅडमी, औरंगाबाद, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘ए’, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स ‘बी’, प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी, सातारा या गटांमधून सोडत करण्यात आली आहे. पुढील फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेची ड्रॉ प्रक्रिया श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पार पडली. यावेळी फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, अरविंद निकम (सर), दशरथराव नाईक निंबाळकर, अशोक गाडगीळ, आर्यन गाडगीळ, अवि कांबळे उपस्थित होते.

या स्पर्धेमुळे ग्रामीण व शहरी भागातील तरुण क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळणार असून, भविष्यातील खेळाडू घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

No comments