Breaking News

फलटण शहरात डिजिटल जनगणनेच्या प्रक्रियेला १ मे पासून सुरुवात - मुख्याधिकारी निखील जाधव

Digital census process to begin in Phaltan city from May 1 - Chief Officer Nikhil Jadhav

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० - केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार, फलटण नगरपरिषद हद्दीतील १६ व्या जणगणनेचे काम लवकरच सुरु होत आहे. विशेष म्हणजे, यंदाची हि जनगणना प्रशासनामार्फत प्रथमच पूर्णपने, " डिजिटल" स्वरूपात मोबाईल अॅपच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखील जाधव यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

    भारत सरकारचे महा. रजिस्ट्रार आणि महाराष्ट्र शासन जनगणना संचालनालय यांच्या निर्देशानुसार हि प्रक्रिया पार पडत आहे. जनगणनेच्या माध्यमातून गोळा करण्यात येणारी सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती भविष्यातील विकास योजना आखण्यासाठी व साधन संपत्तीच्या योग्य वाटपासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे.

    हि जनगणना प्रामुख्याने २ टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घर यादी आणि घर गणनेचे काम केले जाईल.

    यामध्ये १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना census.gov.in या संकेतस्थळावर "स्व-गणनेचा" (Self-enumeration) पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याद्वारे नागरिक स्वतःच्या घराची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि मालमत्तेची माहिती ऑनलाईन भरू शकतील. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील.

    शहरातील १३ प्रभागांमध्ये हि प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण ९६ प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात साधारणपणे १८० ते २०० घरे आणि ७००-८०० लोकसंख्येचा समावेश आहे.

    याकामासाठी ९२ प्रगणक आणि १८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना ५ मे ते ७ मे २०२६ या दरम्यान विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

    प्रत्येक कुटुंबाला जणगणनेनंतर एक स्वतंत्र ओळख पत्र क्रमांक प्राप्त होईल, जो भविष्यातील कामासाठी नागरिकांनी जपून ठेवणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकास प्रगणकामार्फत एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत.

    हि माहिती केवळ आकडेवारी नसून राज्याच्या प्रगतीचा आधार असल्याने, कोणतीही भीती न बाळगता नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती द्यावी आणि प्रशासनांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखील जाधव यांनी केले आहे.

No comments