Breaking News

डॉ.आंबेडकर हाऊस लंडन येथे भीम स्फुर्ती पुरस्कार वितरण व भीम जयंती कॅलडरचे प्रकाशन संपन्न

Bhim Sfurti Award distribution and Bhim Jayanti Calendar publication at Dr. Ambedkar House london

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० :- महाराष्ट्र, भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंतांना सन २०११ पासून प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'भीम स्फुर्ती पुरस्कार'  लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक घरात   'डॉ.आंबेडकर हाऊस, लंडन'  येथे  प्रदान करण्यात आला. याबरोबरच सन २०२६-२७ चे भीम जयंती कॅलेंडर  प्रकाशित करण्यात आले.

    सन २०११ फलटण पासून भीम स्फूर्ती पुरस्काराची सुरू झालेली  गौरवशाली परंपरा यंदाही यशस्वीरित्या पार पडली असून, फलटणचे नाव जागतिक स्तरावर अभिमानाने कोरले गेले आहे. यासोबतच सन २०२१  पासून "भीम जयंती कॅलेंडर"  प्रकाशित करण्यात येते. ते मोफत वितरीत करण्यात येते.

    लंडनच्या १० किंग हेन्री रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान, जे आता महाराष्ट्राच्या वतीने अधिकृत स्मारक म्हणून विकसित करण्यात आले आहे. सन २०२६ चा भीम स्फुर्ती पुरस्कार डॉ प्रा शरद गायकवाड, कोल्हापूर, डॉ विना राऊत नारनवरे, नागपूर, डॉ कमल सहारे, रायपूर, संथागार फाउंडेशन, नागपूर, फुले शाहू आंबेडकर विचार मंडळ, भोर यांना प्रदान करण्यात आला.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठी, तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने प्रबुद्ध इंटरनॅशनल, आंबेडकरी प्रजा परिषद, (एम) AIM, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसार मंडळ यांच्या वतीने भीम स्फुर्ती  हा पुरस्कार दिला जातो.

    हा पुरस्कार वितरण सोहळा लंडन येथील आंबेडकर हाऊसमध्ये होणे, हे फलटणकरांसाठीअभिमानास्पद बाब आहे.  सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात कार्य करणाऱ्या राष्ट्रीय,अंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

    या कार्यक्रमाचे नियोजन , व्यवस्था व पुरस्कार वितरण सिद्धार्थ अहिवळे, मिलिंद अहिवळे, शारदाबाई तांबे यांनी केले.

No comments